MANTRALAYA

MANTRALAYA

Friday, 17 July 2015

मंत्रालय आणि विधिमंडळातील पत्रकारांना आवाहन


"मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघा"ची नुकतीच नोंदणी करण्यात आली असून सदर संघ "जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" या कामगार कायद्याखाली नोंद असलेल्या पत्रकार संघटनेशी संलग्न करण्यात आला आहे.

आज पर्यंत मंत्रालय आणि विधिमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देणारी कोणतीही नोंदणीकृत संघटना अस्तित्वात आली नसल्याने "मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ" नोंदणीकृत करण्यात आला आहे. यापुढे मंत्रालय आणि विधिमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या सर्व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदर संघ कार्यरत राहणार असून बीट वरील सर्वच पत्रकारांना संघटनेचे सभासदत्व दिले जाणार आहे. तरी मंत्रालय तसेच विधिमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या सर्व अधिस्वीकृतीधारक आणि इतर सर्वच पत्रकारांनी नोंदणीकृत संघटनेचे सभासद व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. "मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघा"चे सदस्य होण्यासाठी संघाचे अध्यक्ष अजेयकुमार जाधव (मो.- 9969191363) व सरचिटणीस नागेश दाचेवार (मो.- 9270333886 ) यांच्याशी संपर्क साधावा.

"मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ" नोंदणीकृत झाला


"मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघा"ची नुकतीच नोंदणी करण्यात आली असून सदर संघ "जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" या कामगार कायद्याखाली नोंद असलेल्या पत्रकार संघटनेशी संलग्न करण्यात आला आहे.

आज पर्यंत मंत्रालय आणि विधिमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देणारी कोणतीही नोंदणीकृत संघटना अस्तित्वात आली नसल्याने "मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ" नोंदणीकृत करण्यात आला आहे. यापुढे मंत्रालय आणि विधिमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या सर्व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदर संघ कार्यरत राहणार असून बीट वरील सर्वच पत्रकारांना संघटनेचे सभासदत्व दिले जाणार आहे. 

MEMBERSHIP FORM

MEMBERSHIP FORM